www.24taas.com, चेन्नई
भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये आज वन-डेची लढाई रंगणार आहे. पावसामुळं सामन्याला ऊशीर झालाय.
तीन वन-डेच्या सीरिजमधील पहिली वन-डे ही चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर रंगेल. टी-२० सीरिज बरोबरीत राखल्यानंतर आता टीम इंडियासमोर वन-डे सीरिज जिंकण्याच आव्हान असेल.
भारत - पाकिस्तान यांच्यात रविवारपासून वनडे क्रिकेट मालिकेला सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिल्या सामन्याला स्थानिक चिदंबरम स्टेडियमवर सकाळी ९ वाजता सुरूवात होणार होती.
तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा वनडे ३ जानेवारी रोजी कोलकाता येथे आणि तिसरा व अखेरचा वनडे ६ जानेवारी रोजी नवी दिल्लीत होईल. या सामन्यापूर्वी दोन्ही संघांनी नेटवर कसून सराव केला. दोन्ही संघांत असे बरेच खेळाडू आहेत, ज्यांनी टी-२०मालिकेत सहभाग घेतला नव्हता. १९९९ प्रथम दोन्ही टीम चेन्नईत खेळतील.
टी-२०मालिका बरोबरीत सुटल्यानंतर दोन्ही संघांचा आत्मविश्वास उंचावला आहे. पाकिस्तानची गोलंदाजी आणि भारतीय फलंदाजी यांच्यातील जोरदार संघर्षासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. २०१२ वर्षाला विजयाने निरोप देण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल.
अटीतटीच्या अहमदाबाद टी-२० मध्ये टीम इंडियाने बाजी मारली. भारताने पाकवर ११ रन्सने मात केली. या विजयासह दोन मॅचेसची टी-२०सीरिज १-१ने बरोबरीत राखण्यात टीम इंडियाला यश आलं. ७२ रन्सची धुवाँधार इनिंग खेळणार युवराज सिंग टीम इंडियाच्या विजयाचा ख-याअर्थाने शिल्पकार ठरला.