आरोग्यासाठी कांद्याचे सात महत्त्वपूर्ण फायदे

आयुर्वेदात कांद्याचे खूप गुणधर्मला सांगितले गेलेय. कांदा जेवणाला स्वादिष्ट करण्यासोबतच एक उत्तम औषधी गुणधर्मयुक्त आहे. अनेक आजारांवर कांदा रामबाण उपाय ठरतो. कांदा लाल, पांढरा किंवा हिरवा असो तो आरोग्यासाठी एक वरदानच आहे.

Updated: Aug 19, 2015, 01:43 PM IST
आरोग्यासाठी कांद्याचे सात महत्त्वपूर्ण फायदे title=

मुंबई: आयुर्वेदात कांद्याचे खूप गुणधर्मला सांगितले गेलेय. कांदा जेवणाला स्वादिष्ट करण्यासोबतच एक उत्तम औषधी गुणधर्मयुक्त आहे. अनेक आजारांवर कांदा रामबाण उपाय ठरतो. कांदा लाल, पांढरा किंवा हिरवा असो तो आरोग्यासाठी एक वरदानच आहे.

जाणून घ्या कांद्याचे सात महत्त्वाचे फायदे-

रोग प्रतिकारक शक्तीत वाढ: कांदा शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढवतो. जवळपास प्रत्येक भाजीत कांदा टाकला जातो, त्यामुळं तो व्हिटॅमिन सीच्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त ठरतो.

कर्करोग प्रतिबंधासाठी उपयुक्त: कांदा कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी उपयुक्त ठरतो. कांदा अँटिऑक्सिडंट युक्त आहे. कांद्यात असलेल्या व्हिटॅमिन सीमुळे कँसरवर प्रतिबंधासाठी मदत होते.

सेक्स पॉवर वाढविण्यासाठी उपयुक्त: कांदा कामेच्छा जागृत करण्यासाठी खूप सहाय्यक ठरते. यासाठी पातीचा कांदा विशेष उपयुक्त ठरतो. आहार तज्ज्ञांच्या मते, लैंगिक दुर्बलता दूर ठेवण्यासाठीही कांदा गरजेचा ठरतो. 

मधुमेहावर रामबाण उपाय: कांदा मधुमेहाच्या रुग्णांसाठी गुणकारी ठरतो. शरीरातील इंसुलिनचं प्रमाण कांद्यामुळं वाढतं. सोबतच रक्तातील साखरेचं प्रमाणही कांदा नियंत्रित ठेवतं. 

पचनक्रिया वाढते: कांदा शरीरातील पचनक्रिया चांगली करतो. कांदा खाल्ल्यानं जेवण पचायला मदत होते. कारण कांदा खाल्ल्यानं पाचक रस शरीरात प्रवाहित होतो आणि जेवण पचविण्यात मदत होते.

त्वचेसाठी उत्तम: कांद्यात अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतं. व्हिटॅमिन ए, सी आणि ई असल्यानं त्वचा चमकदार होण्यास मदत मिळते. कांदा नियमित खाल्ल्यानं त्वचा चमकदार होते.

दीर्घायुष्यासाठी: कांद्याचा रस कोणत्याही औषधी वनस्पती पेक्षा कमी नाही. यामुळं अनेक आजार दूर राहतात. त्यामुळंच असं म्हणतात कांदा खाल्ल्यानं मनुष्याचं आयुष्य वाढतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.