गर्भपातामुळे महिलांना हा त्रास होतो

अनेकदा काही कारणांमुळे गर्भपात होतो. मात्र गर्भपात झाल्यानंतरही स्त्रियांना बऱ्याच त्रासाला सामोरे जावे लागते. गर्भपातानंतर महिलांच्या शरीरात मोठे बदल होतात. यादरम्यान इन्फेक्शन होण्याचीही अधिक भिती असते. 

Updated: Jul 25, 2016, 10:36 PM IST
 गर्भपातामुळे महिलांना हा त्रास होतो title=

मुंबई : अनेकदा काही कारणांमुळे गर्भपात होतो. मात्र गर्भपात झाल्यानंतरही स्त्रियांना बऱ्याच त्रासाला सामोरे जावे लागते. गर्भपातानंतर महिलांच्या शरीरात मोठे बदल होतात. यादरम्यान इन्फेक्शन होण्याचीही अधिक भिती असते. 

गर्भपातानंतर मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होतो. काही स्त्रियांना याचा त्रास कमी होतो. कधी कधी तीन ते चार आठवड्यांपर्यंत रक्तस्त्राव होतो. मात्र रक्तस्त्राव अधिकच होत असल्यास वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे असते. 

गर्भपातामुळे महिलेच्या शरीरात मोठे बदल होतात. पेटक्यांसारखे दुखणे जाणवते. गर्भपातानंतर काही काळ हा त्रास जाणवतो. मात्र त्यानंतरही दुखणे सुरु असल्यास डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्यावा

गर्भपातानंतर इन्फेक्शन होण्याची भिती अधिक असते. त्यामुळे यादरम्यान सुरक्षा अधिक ठेवावी. 

गर्भपातामुळे काही महिलांना तापही येतो. शरीरात इन्फेक्शन झाल्यास महिलांना हा त्रास जाणवतो. 

काहीवेळा गर्भपातानंतर महिलांना डिप्रेशन येते. यासाठी तुमच्या शरीराल अधिक विश्रांतीची गरज असते.