न्यूयॉर्क : सकाळी सकाळीच सेक्स केल्यानंतर तुम्ही दिवसभर ताजेतवाने राहता. तसेच तुमचे आरोग्यही चांगले राहून तुम्ही अधिक उत्साही राहता. ही बाब एका अभ्यासाअंती स्पष्ट झाली आहे.
सकाळी मॉर्निक वॉक किंवा जॉगिंगला जाण्याने जो फायदा होतो. तो सकाळी सेक्स केल्याने मिळतो. मीडिया अहवालने लैंगिक आरोग्य शिक्षणतज्ज्ञ आणि प्रसिद्ध पुस्तक 'बिकाऊज आय फिलगुड " लेखक डेब्बी हर्बेनिक याच्या हवाला दिला आला आहे. सकाळी सेक्स केल्याने तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते.
सकाळी लैंगिग संबंध ठेवल्याने दिवसभर आपण आनंदी आणि ताजे राहता. हर्बेनिक यांच्या मतानुसार सेक्सच्यावेळी असे काही रसायन स्त्राव होतो त्यामुळे तुमच्या शरीरात एस्ट्रोजन पातळी वाढते. त्यामुळे आपली त्वचा आणि केस निरोगी आणि भक्कम राहण्यास मदत होते.
सेक्समुळे एस्ट्रोजन आणि वृष्णात तयार होणाऱ्या संप्रेरकच्या पातळीत वाढ होते. त्यामुळे आपण नेहमी तरुण दिसतो. हा सकाळी सेक्स केल्याचा फायदा आहे, असे अभ्यासक सांगतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.