मुंबई: कडू चवीमुळं अनेकांना कारलं आवडत नाही. मात्र कारल्यात अॅन्टीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन असतात जे आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात. ज्यामुळं शरीर निरोगी राहतं.
यात मोठ्या प्रमाणात व्हिटामिन 'ए', 'बी', 'सी' असतात. हे कॅरोटीन, बीटाकॅरोटीन, लूटीन, आयर्न, जिंक आणि मॅग्नेशिअम मोठ्या प्रमाणावर आढळतात. यामुळे चेहऱ्यावरील डाग, पुरळ, मुरुम तसंच त्वचा रोगांपासून मुक्ती मिळण्यास मदत होते.
रोज रिकाम्या पोटी कारल्याच्या रसात लिंबाचा रस टाकून पिल्यानं त्वचेवर फरक दिसेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.