www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मनसे वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात भाषणादरम्यान शिशिर शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर थेट आणि गंभीर आरोप केलेत. `शिवसेना कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधून उद्धव ठाकरे यांनी स्वत: मात्र व्हिडिओकॉनच्या राजकुमार धूतकडून २५ कोटींचा गंडा बांधून घेतला` असं वक्तव्य मनसे नेते शिशिर शिंदे यांनी केलंय.
शिवसेना नेतृत्वावर सरळसोट टीका करत शिशिर शिंदे यांनी `कार्यकर्त्यांना शिवबंधन... एक छोटा तो दोरा आणि मात्र स्वत:ला मात्र व्हिडिओकॉनच्या राजकुमार धूतकडून २५ कोटीचा गंडा बांधून घेतला... तुम्हाला जर ते शिवबंधन बांधायचंच होतं तर मुंबईतील महापौरांना बांधायचं होतं, स्थायी समिती चेअरमन राहुल शेवाळेंना बांधायचं होतं...` असं म्हटलं.
`फार काही सांगायची गरज नव्हती, फक्त एव्हढचं सांगायचं होतं की, ज्या मुंबईकर जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवला त्या लोकांचा विश्वासघात करणार नाही... मुंबईकरांसाठी उत्तम रस्ते देऊ, साफसफाई करु, खडेमुक्त रस्ते देऊ असं काही तरी... पण, त्यांना दिला गेला गंडा... त्यांनी सर्वांना गंडवलं... स्वत: मात्र धूतकडून २५ कोटींना बांधून घेतलं`.
राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या भेटींबाबत बोलताना, `पूर्वी मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरेंना भेटायला विविध लोक येत होते तेव्हा मात्र कौतुक होत होतं... आता राज साहेबांना भेटायला जे लोक आले ते चांगलेच लोक होते... महाराष्ट्राच्या आणि देशांच्या हिताच्या विचार करणारे लोक आले तर त्यावरून अनेकांना पोटदुखी झाली... ज्यांची भेट झाली ते सगळे राज ठाकरेंना भेटायला आले होते, राज ठाकरे स्वत:हून कुणाला भेटायला गेले नाहीत` असं देखील शिंदेंनी म्हटलंय.
यावेळी, त्यांनी राज्य सरकारवरही टीका करत, `महाराष्ट्र नंबर वनवर आहे, पण कशासाठी... झोपडपट्टयांसाठी महाराष्ट्राला पहिला नंबर... स्टँम्प ड्युटीसाठी महाराष्ट्राचा पहिला नंबर... दारु उत्पादनासाठी महाराष्ट्राला पहिला नंबर... दारुच्या महसुलीसाठी महाराष्ट्राला पहिला नंबर...` असं म्हटलंय.
शिवसेनेचे अभिजीत पानसे, सुनील धांडे तर राष्ट्रवादीचे विष्णू गायकवाड हेही यांनी यावेळी मनसेत प्रवेश केला. यावर, ये तो अभी झाँकी है, असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलंय.
व्हिडिओ पाहा -
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.