औरंगाबादमध्ये क्रांती चौक उड्डाण पुलाचं काम ३ वर्षांपासून सुरूय.पण पूर्ण तयार होण्याआधीच या उड्डाण पुलाला तडे गेलेत. झी २४ तासनं या धोकादायक पुलाची बातमी सर्वप्रथम दिली. याचा पाठपुरावाही झी २४ तासनं केलाआणि अखेर याला यश आलं.आता हा धोकादायक पुल पाडायला सुरूवात झालीय़.
क्रांती चौकातला उड्डाण पूल पाहून असं वाटेल की जुना पूल पाडण्याचं काम सुरूय. पण तसं नाहीये. हा उड्डाण पूल ३ वर्षांपूर्वी बांधायला सुरूवात झाली. पण बांधून पूर्ण होण्याआधीच त्याला तडे गेलेत. ही बाब सर्वप्रथम झी २४ तासनं समोर आणली. या गंभीर घटनेचा झी २४ तासनं पाठपुरावाही केला. अखेर हा तडे गेलेला पूल पाडण्यात येत आहे. या पुलाचं काम अंतिम टप्प्यात आल्यांनतर त्याला तडे गेले. झी २४ तासनं याबाबत बातमी दाखवल्यानंतर या पुलाच्या तपासणीसाठी एक समिती नेमण्यात आली. या समितीनं दिलेला अहवाल धक्कादायकच म्हणावा लागेल. कारण या पुलाचं बांधकामचं चुकीचं असल्याचा अहवाल म्हटलंय. त्यामुळं तडे गेलेले ४ पिलर्स पाडण्याचं काम सुरू झालंय.
या निष्काळजीपणाचा फटका आणखी सहा महिने औरंगाबादकरांना बसणारय. पूल २००८ मध्ये बांधायला सुरूवात केली होती. पुलासाठी १३ कोटी मंजूर झाले होते. पण संथ गतीनं चाललेल्या कामामुळे याचा खर्चआता २० कोटींच्या घरात गेलाय. पुलाचा आराखडाही दोषी असल्यानं खळबळ माजलीय. पुलाचे सदोष पिलर्स तर पाडायला सुरूवात झालीय. पण दोषींवर कारवाई कधी होणार असा सवाल उपस्थित होतोय.