www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मास्टर-ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर युनिसेफचा ब्रँड अॅम्बेसिडर झाला आहे. आता सचिन आरोग्याविष्यी जनजागृती करणार आहे. मास्टर-ब्लास्टर आता आरोग्याविषयीचे धडे देण्याचं काम कऱणार आहे.
याआधी २००८ मध्येही सचिन युनिसेफचा ब्रँड अॅम्बेसिडर झाला होता. जगभरातील मुलं आणि महिला आरोग्याच्या साध्यासाध्या सवयी पाळून एक निरोगी आरोग्य जगू शकतात असा संदेश देण्याचा आपला प्रयत्न असल्याचं सचिननं म्हटलंय.
युनिसेफच्या करारावर सचिनने युनिसेफच्या भारतातील प्रतिनिधी कॅरिन हुलशॉफ यांच्या साक्षीने स्वाक्षरी केली. दररोज अस्वच्छतेमुळे होणाऱ्या आजारामुळे १६०० मुले मृत्युमुखी पडतात. ही आकडेवारी धक्कादायक आहे. त्यामुळे स्वच्छतेचे धडे देण्यासाठी सचिनला करारबद्ध करण्यात आलंय.
युनिसेफच्या कार्यक्रमाअंतर्गत मी ज्या मोहिमेचा भाग आहे. त्यासंबंधी जास्तीत जास्त लोकांना जागरूक करण्याचा माझा प्रयत्न असेल. प्रत्येकांने साबणाने हात धुतले पाहिजे. हात धुणे ही सोपी गोष्ट आहे, असे सचिनने सांगितले.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
सचिन तेंडुलकर युनिसेफचा ब्रँड अॅम्बेसिडर, देणार स्वच्छतेचे धडे