www.24taas.com, मुंबई
महिला क्रिकेट वर्ल्ड कपच्या पहिल्याच मॅचमध्ये भारतीय महिला टीमने विजयी सलामी दिली. ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या पहिल्याच मॅचमध्ये भारताने वेस्ट इंडीजला 105 रन्सने पराभूत केल. प्रथम बॅटिंग करणा-या भारताने वेस्ट इंडीजसमोर विजयासाठी 285 रन्सच आव्हान ठेवल होतं. मात्र विंडिजची टीम 179 रन्सवरच ऑल आऊट झाली.
भारताकडून थिरूशी कामिनी हिने शानदार सेंच्युरी झळकावली. तर पूनम राऊतने 72रन्सची तडाखेबंद खेळी केली. झुलन गोस्वामी आणि हरमनप्रीत कौरने प्रत्येकी 36-36 रन्सची इनिंग खेळली. भारताकडून नागराजन निरंजनाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
गुहार सुल्ताना आणि झुलन गोस्वामीने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. या विजयाबरोबरच भारता `ए` ग्रुपमध्ये अव्वल स्थानी पोहलचाय. आता भारताचा आगामी मुकाबला 3 फेब्रुवारीला गतविजेत्या इंग्लंडशी होणार आहे.