www.24taas.com, झी मीडिया, नंदुरबार
नंदुरबार जिल्ह्याच्या घराघरात कमळ पोहचावा, असं आवाहन करत, राष्ट्रवादीतून हकालपट्टी झालेले मंत्री डॉ. विजयकुमार गावित हे साक्री आणि नंदुरबार या दोन ठिकाणी भाजपच व्यासपीठावर दिसून आले.
कन्या हिना गावीत यांच्या भाजपा उमेदवारीवरून मंत्री पद गमवलेले राष्ट्रवादीचे नेते डॉ. विजयकुमार गावित यांनी महायुतीच्या व्यासपीठावरून भाजपच्या उमेदवार डॉ हीना गावित यांना विजयी करण्याचे आह्वान केले. त्यासोबत त्यांनी कॉंग्रेसवर टीका करीत नरेद्र मोदींच्या नेतृत्वाचं कौतुकही केलं. यावेळी प्रत्येक कार्यकत्यांनी घरोघरी जाऊन या निवडणुकीत आपल्या कमळाला मतदान करायचे आहे हे समजून सांगा, असे आवाहन डॉ गावितानी केले.
एरवी कॉंग्रेसला विधानसभा आणि लोकसभेत छुपा विरोध करणारे डॉ गावित या वेळी कॉंग्रेसला समोरसमोर धडक देणार आहेत . व्युहरचनेत तरबेज असलेल्या डॉ गाविताच्या उघड भाजप प्रचारा मुळे कॉंग्रेस नेत्यांचे धाबे दाणले आहे. यात शंका नाही.
डॉ. विजयकुमार गावित यांनी महायुतीच्या व्यासपीठावरून काँग्रेस वर टीका करीत नरेद्र मोदींचे कौतुक केले. राज्याच्या राजकीय पटलावर गेल्या काही दिवसापासून गाजत असलेल गावित आणि त्याच्या कन्या हीना यांच्या पक्ष प्रवेशाच्या नाट्याचा नंदुरबार लोकसभा मतदार सांगत शनिवारी शेवटचा अंक पाहायला मिळाला .
डॉ हीना गाविता यांच्या पाठोपाठ डॉ. विजयकुमार गावित देखील भाजपच्या वाटेवर आहेत. सक्री आणि नंदुरबारात डॉ गावितांनी भाजपच्या मंचावर उपस्थिती नोंदून भविष्याच्या वाटचालीचे संकेत स्पष्ट केले आहेत. नंदुरबार लोकसभा मतदार संघात ३० ते ४० वर्षांपासून मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. मात्र त्यांनी कोणताही विकास केला नाही. त्यांनी फक्त जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा काम केले आहे, असा आरोप विजयकुमार गावित यांनी भाजपच्या मंचावरून केला आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.