दुर्मिळ बॉम्बे ब्लड ग्रुपची कमतरता...

बॉम्बे ब्लड ग्रुप हा मुंबईच नात सांगणारा ब्लड ग्रुप आहे. मुंबईच सौभाग्य म्हणा अथवा दुर्भाग्य बॉम्बे ब्लड ग्रुप जगात दुर्लभ आहे. या रक्तगटाच्या व्यक्तीचा अपघात झाला तर या ग्रुपच्या रूग्णांना रक्त मिळताना मुष्कील होत आहे.

Updated: May 24, 2012, 11:54 PM IST

www.24taas.com,  मुंबई

 

बॉम्बे ब्लड ग्रुप हा मुंबईच नात सांगणारा ब्लड ग्रुप आहे. मुंबईच सौभाग्य म्हणा अथवा दुर्भाग्य बॉम्बे ब्लड ग्रुप जगात दुर्लभ आहे. या रक्तगटाच्या व्यक्तीचा अपघात झाला तर या ग्रुपच्या रूग्णांना रक्त मिळताना मुष्कील होत आहे. या बॉम्बे ब्लड ग्रुपची व्यक्ती कुठल्याही ब्लड ग्रुप रक्तदान करू शकते. मात्र दुसऱ्याच भल करणाऱ्या या ब्लड ग्रुपच्या व्यक्तीला इतरांच रक्त मॅच होत नसल्यामुळे रक्त संक्रमण शिबिरात चिंता व्यक्त केली जात आहे. बॉम्बे ब्लड ग्रुप. मुंबईच नात सांगणारा ब्लड ग्रुप.

 

१९५२ मध्ये केईएम रूग्णालयात डॉक्टर व्हाय.एम.भेंडेनी या रक्तगटाचा शोध लावला. जगात या ब्लड ग्रुपचे दुर्मिळ रक्तदाता आढळतात. देशात १०० बॉम्बे ब्लड ग्रुपचे रक्तगटाच्या व्यक्तीचा शोध लागला आहे. यातील मुंबईतील सव्वा कोटी लोकसंख्येत फक्त ५० जणच बॉम्बे ब्लड ग्रुपचे आहेत. या ५० जणात २० रक्तदाता रक्तदान करण्यास आतापर्यंन्त पुढे आले आहेत. त्यामुळे एखादी दुर्घटना घडली तर दुसऱ्याच भल करणाऱ्या या ब्लड ग्रुपच्या व्यक्तीला इतराच रक्त मॅच होत नसल्यामुळे या ब्लड ग्रुपच्या जीव वाचवताना टेंशन येत असल्याच खुद्द रक्तपेढीच्या संचालकानी मान्य केलं. बॉम्बे ब्लड ग्रुप हा आपला ब्लड ग्रुप आहे.

 

याची ओळख पटल्यानंतर आपल्याला देवीशक्ती लाभल्याची जाणीव या रक्तदात्याना असली. तरी नेहमीच कामावर जाताना बॉम्बे ब्लड ग्रुपची व्यक्ती व्यायामासह हेल्थबाबत विशेष काळजी घेताना दिसते. बॉम्बे ब्लड ग्रुप इतका दुर्मिळ आहे की देश - विदेशातील रक्तदाता थिंक फाउन्डेशन रक्तपेढीकडे मागणी करतात. ज्यात पाकिस्तान, ढाका, चीन रक्तदात्याची मागणी अधिक आहे. हा ब्लड ग्रुप दुर्मिळ असल्यामुळे राज्य रक्त संक्रमण कौन्सिलन या व्यक्तीना विशेष मदत करावी अशी मागणी सामाजिक संस्थानी केली.