पाहा कार्बनचा सगळ्यात 'स्वस्त टॅब्लेट'

टॅब्लेट म्हणजे आजकाल प्रत्येक कॉलेजात जाणाऱ्या मुलांकडे असतोच असतो. दिवसेंदिवस टेक्नॉलॉजीमध्ये होणारा बदल आणि त्यामुळे त्यातून अनेक नवीन गोष्टी समोर येत असतात.

Updated: Aug 6, 2012, 05:24 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

टॅब्लेट म्हणजे आजकाल प्रत्येक कॉलेजात जाणाऱ्या मुलांकडे असतोच असतो. दिवसेंदिवस टेक्नॉलॉजीमध्ये होणारा बदल  आणि त्यामुळे त्यातून अनेक नवीन गोष्टी समोर येत असतात. असाच काहीसा प्रकार म्हणजे टॅब्लेट होय. टॅब्लेटमध्ये सहजासहजी उपलब्ध असणारे आणि वापरास अत्यंत सोपे असे फिचर्स यामुळे तरूण साहजिकच त्याकडे आकर्षित होत आहेत. टॅब्लेट पीसीने सध्या धुमाकूळ घातला असून नवनवीन कंपन्यांचे टॅब्लेट बाजारात येत आहेत.

 

यामध्ये भर पडली आहे ती कार्बन मोबाईल कंपनीची. या कंपनीने स्वस्तातला ‘कार्बन स्मार्ट टॅब १’ हा आणखी एक स्वस्त टॅबलेट बाजारात आणून खळबळ उडवली आहे.

 

यामध्ये अँड्रॉईड ४.१ जेली बीन ऑपरेटिंग प्रणाली असून आतापर्यंतचे सर्वात गतिमान आणि सोपे आधुनिक तंत्रज्ञान पहिल्यांदाच उपलब्ध केल्याचा दावा या कंपनीने केला आहे. त्याची किंमत ६९९० रुपये आहे.