www.24taas.com, मुंबई
तुम्ही नेट बॅंकिंगचा सातत्याने वापर करत असाल तर सावधानता बाळगली पाहिजे. अन्यथा तुमच्या खात्यातील पैसे चोरीला गेले समजा. मात्र, हे पैसे कधी आणि कसे चोरीला जातात याचा पत्ता लागत नाही. आपल्या बँक अकाऊंटमधून कोणत्याही हॅकरच्या हस्तक्षेपाशिवाय पैसे आपोआप दुस - यांच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर होऊ शकतात. त्यामुळे आपले अकाऊंट नील होऊ शकते.
.
हॅकरच्या हस्तक्षेपाशिवाय पैसे दुसऱ्याच्या खात्यात जमा करणाऱ्या अशा प्रकारचा अनोखा गुन्हा करणारे सॉफ्टवेअर नुकतेच विकसित करण्यात आले आहे .नुकत्याच उघड झालेल्या एका प्रकरणामध्ये स्पाय आय आणि झेऊस या दोन प्रोग्रामच्या माध्यमातून १३ हजार युरोजची चोरी झाली होती . अशाप्रकारचे सायबर हल्ले जर्मनी , ब्रिटन आणि इटली या देशांमध्ये सुरू झाल्याची माहिती जपानमधील आर्थिक व्यवहारावर संशोधन करणारी ट्रेण्ड मायक्रो या रिसर्च कंपनीने उघड केली आहे.
असे असले तरी बँका सुरक्षा कवच गुन्हेगार भेदण्यासाठी प्रत्येकवेळी नवी क्लृप्ती लढवू लागले . यातून अखेर बँकांनी हॅकिंगचे सर्व मार्ग जखडून टकले . यामुळे हॅकर्सना ऑनलाइन बँकांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी करणे कठीण जाऊ लागले . मात्र, बँकांच्या सॉफ्टवेअर कोडमध्ये शिरकाव केला आणि यामध्ये त्यांनी विकसित केलेला प्रोग्राम इंस्टॉल केला . काही गुन्हेगारांनी बँकांच्या वेबसाइटच्या टूलकिटमध्ये जाऊन हल्ला करण्याचा नवा मार्ग शोधला आहे . यामध्ये ते कोणतीही सिस्टिम वापरत नाहीत . यामुळे त्यांना पकडणे कठीण जाते . हे सर्व काम ऑटोमेटेड असते . यामुळे कोणासही न कळत आपल्या अकाऊंटमध्ये काही पैसे दुसरीकडे ट्रान्सफर होत असतात. हा व्यवहार एक - एक पैशापासून सुरू होतो आणि तो हळू हळू हजारोंमध्ये पोहोचतो आणि शेवटी सर्व पैसे दुसऱ्याच्या खात्यात जमा होतात. त्यामुळे आपण खबरदारी घेतलेली बरी.
कशी घ्याल काळजी
. बँकिंग व्यवहार ऑनलाइन करताना व्हर्च्युअल की - बोर्डचा वापर करा . (वेब पेजवरच असतो)
.पासवर्ड रिमाइंडरला कधीही ओके म्हणू नका. ओके केले तर तुमचे ऑनलाइन अकाऊंट हॅक होईल .
. पासवर्डमध्ये स्वतःचे, पालकांचे नाव , जन्मतारीख देऊ नक . (उदा. a12c@ua12sunx1 या पद्धतीने पासवर्ड हवा)
. तुमच्या बँक अकाऊंटच्या बॅलन्स रकमेतील पैशांचाही हिशेब ठेवला पाहिजे.