www.24taas.com, वॉशिंगटन
उजळणी आणि अकडेमोड ही फक्त मनुष्यालाच जमते, असं वाटत असेल, तर तसं नाहीये. शास्त्रज्ञांनी शोध लावलाय की काळ्या अस्वलांनाही अंकज्ञान असते.
अमेरिकेतील ऑकलंड विश्वविद्यालयातील शास्त्रज्ञांनी या संदर्भात संशोधन केलं. तीन अस्वलांची उजळणी करण्याची क्षमता टच स्क्रीनद्वारे मोजली. यातून त्यांच्या लक्षात आलं की दिल्या गेलेल्या ख्यांपैकी सर्वांत मोठी संख्याही अस्वलांना मोजता आली.
डॉक्टर जेनिफर वॉक यांचं म्हणणं आहे की अस्वलांना लोक जास्त बुद्धिमान मानत नाहीत. पण प्रत्यक्षात अस्वलं बुद्धिमान असतात. टच स्करीनद्वारे अस्वलांचा अभ्यास करण्याचा हो पहिलाच प्रयोग होता. आत्तापर्यंत कधीही एवढ्या मोठ्या मांसाहारी जनावरासोबत टच स्क्रीनद्वारे प्रयोग केला गेला नव्हता.