www.24taas.com, कोल्हापूर
करवीर निवसिनी महालक्ष्मी देवीच्या दागिन्यांचे मुल्यांकन ४० वर्षानंतर पहिल्यांदाच सुरु झालंय. त्यामुळं गेल्या ४० वर्षांत पहिल्यांदाच हा खजिना समोर येणार आहे.
अनेक राजे-रजवाडे आणि देशभरातील प्रतिष्ठित व्यक्तींनी, भक्तांनी देवीला दागिन्यांची भेट चढवलीय. कोल्हापुरी साज, ठुशी, मोहनमाळ, बाजूबंद, कंठिहार, पुतळीहार, मणीहार अशा पारंपारिक दागिन्यांचं मुल्यांकन सुरु झालं असून या मोजणीला दहा दिवस लागण्याची शक्यता आहे. कडक पोलीस बंदोबस्तात या मोजणीला सुरुवात झालीय. पुरातन दागिन्यांची किंमत आजच्या बाजारभावानुसार लावली जाणार आहे त्यामुळे महालक्ष्मीचा खजिना किती कोटींचा आहे ते समोर येईल.
पहिल्या दिवशी दोन कोटींच्या दागिन्यांची मोजदाद झालीय. महालक्ष्मीचा खजिना प्रचंड मोठा आहे. अनेक कपाटे सोन्याचांदीच्या दागिन्यांनी भरली आहेत.
.