महागाईत दूध आणि पेट्रोलचा भडका

महागाईच्या भडक्यात आज पेट्रोल दरवाढीची भर पडण्याची शक्यता आहे. आज पेट्रोल दरवाढीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Updated: Mar 31, 2012, 02:36 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

 

महागाईच्या भडक्यात पेट्रोल दरवाढीची भर पडण्याची शक्यता आहे. आज पेट्रोल दरवाढीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

 

 

प्रतिलिटर पेट्रोल ३ रुपये महागण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाच्या वाढत्या किंमती हे दरवाढीमागचं मुख्य कारण असेल. ५ राज्यातल्या विधानसभा निवडणुकांमुळे देशात पेट्रोलची दरवाढ होऊ शकली नव्हती. मात्र आता बजेटनंतर केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनीही पेट्रोल दरवाढीचे संकेत दिले होते. तर दुसरीकडं मुंबईत दूधाच्या किंमती पुन्हा वाढणार आहेत.

 

 

एक एप्रिलपासून मुंबईतील खुले दूध तीन रुपयांनी वाढणार असून ते आता ४८रुपये प्रतिलिटर दराने मुंबईकरांना मिळणाराय. महागाईमुळं दूधाचे दर वाढविण्याशिवाय पर्याय नसल्याचं मत मुंबई मिल्क प्रोड्यूसर्स असोशिएशननं व्यक्त केलंय. पेट्रोल, डिझेल, जनावरांचा चारा आणि खाद्याचे दर वाढल्यानं दूधाचे दर वाढणं गरजेचं होतं,  असं मतही त्यांनी व्यक्त केले.

 

व्हिडिओ पाहा..

 

[jwplayer mediaid="75060"]