गुजरात विधानसभेत 'डर्टी पिक्चर'!

कर्नाटक विधानसभेत अश्लील चित्रफित पाहणाऱ्या तीन मंत्र्यांना सत्तेची खूर्ची सोडावी लागली होती. आता गुजरात सरकारमधील आमदारांनी कर्नाटकचा 'पोर्नगेट'चा कित्ता गिरवला आहे. विशेषबाब म्हणजे सभ्य समजल्या जाणाऱ्या भाजपच्या आमदारांचा यात समावेश आहे. दोन्ही राज्यात भाजपचे सरकार सत्तेत आहे.

Updated: Mar 21, 2012, 06:44 PM IST

www.24taas.com, अहमदाबाद

 

कर्नाटक विधानसभेत  अश्लील चित्रफित पाहणाऱ्या तीन मंत्र्यांना सत्तेची खूर्ची सोडावी लागली होती. आता गुजरात सरकारमधील आमदारांनी कर्नाटकचा 'पोर्नगेट'चा कित्ता गिरवला आहे. विशेषबाब म्हणजे सभ्य समजल्या जाणाऱ्या भाजपच्या आमदारांचा यात समावेश आहे. दोन्ही राज्यात भाजपचे सरकार सत्तेत आहे.

 

 

गुजरात विधानसभेत भाजपच्या दोघा आमदारांनी अधिवेशन सुरू असताना अश्लील फोटो (पोर्नगेट) पाहण्यात दंग होते. याची याचे छायाचित्रण वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनने केले. हे चित्रण दाखविल्यानंतर गुजरातमध्ये राजकीय धमाका उडाला आहे.  भाजपचे महामंत्री आणि आमगार शंकर चौधरी आणि आमदार जेठा भडवाड यांच्यावर  पोर्नगेटचा आरोप करण्यात येत आहे. या आरोपानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, आरोप करण्यात आलेल्या आमदारांनी याचा इन्कार केला आहे.

 

 

काँग्रेसने टीका करताना म्हटले आहे, भाजपच्या आमदारांनी विधानसभेचे पावित्र्य भंग केले आहे. लोकशाहीतील उच्चस्थान असलेल्या विधानसभेचा अपमान आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.  आरोप करण्यात आलेले आमदार टॅबेलटवर अश्लील फोटो पाहत होते. ही बाब प्रेसगॅलरीत बसलेल्या पत्रकारांच्या लक्षात आली. त्यानंतर पत्रकारांनी विधानसभा अध्यक्षांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर या आमदारांना टॅबेलट बंद करण्याच्या सूचना दिल्या.

 

 

कर्नाटक विधानसभेचे सत्र सुरू असताना माजी मंत्री लक्ष्मण सवदी, कृष्णा पालेमर आणि सी. सी. पाटील मोबाईलवर पोर्नफिल्म बघतानाचे छायाचित्रण वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनने केले होते. त्यानंतर ते वाहिनीवर प्रक्षेपित करण्यात आले होते. यामुळे कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात बरीच खळबळ माजल्याने तिन्ही मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले होते.