झी २४ तास वेब टीम, मुंबई
दबंग स्टार सलमान खान आता सूरज बडजात्याच्या सिनेमात रोमाँटिक भूमिका साकारणार आहे. लागोपाठ हिट ऍक्शन सिनेमा देणाऱ्या सलमान एका अर्थाने आपल्या मुळांकडे परतत आहे. मागच्या वर्षीच्या अखेरीस सलमानने सूरज बडजात्याची भाची विधी कासलीवालच्या इसी लाईफ मैं मध्ये काम केलं होतं. फिल्म इंडस्ट्रीत त्यावेळेसच सलमान परत एकदा बडजात्या कॅम्पच्या सिनेमात काम करणार अशी चर्चा सुरु झाली होती. आता मागच्याच आठवड्यात सलमानने सूरज बडजात्या सोबत सिनेमा साईन केला आहे. हा सिनेमा बडजात्या स्टाईलमध्ये लव्ह स्टोरीतल्या सलमानच्या व्यक्तिरेखेचे नाव प्रेम असेल हे सांगणं आवश्यक आहे का ? सलमान लागोपाठ ऍक्शन सिनेमात काम केल्याने त्याला ब्रेकची गरज होती. आणि सूरजने सलमानसोबत गोड प्रेम कथेवर आधारीत सिनेमा काढायला तयार झाला.
सूरज बडजात्या आणि सलमान यांचे संबंध खूप जुने आहेत सलमानने सूरज बडजात्याच्या मैने प्यार कियामध्ये नायक म्हणून दमदार पदापर्ण केलं होतं. बॉलिवूडच्या इतिहासतली मेगा हीट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हम आपके है कौन मध्ये सूरज आणि सलमानची जादुई कमाल दिसून आली होती. पण हम साथ साथ है च्या वेळेस या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. त्यावेळेस चित्रिकरमाच्या दरम्यान सलमान शिकारीच्या वादग्रस्त प्रकरणात अडकला आणि सूरजने त्याच्या पासून अंतर ठेवायला सुरवात केली. त्यानंतर सूरजचे मै प्रेम की दिवानी हूँ आणि विवाह हे दोन सिनेमे दिग्दर्शित केले. त्यापैकी विवाहने चांगला व्यवसाय केला होता पण मै प्रेम की दिवानी हूँ फसला. आता सलमान आणि सूरज हे दोघं परत एकत्र येत आहेत बघू या परत एकदा पूर्वीसारखं करिष्मा पाहायला मिळतो का ते ?