'जिस्म-२'चं अनसेंसॉर्ड गाणं 'यूट्युबवर'

बॉलिवूड दिग्दर्शिका पूजा भट्टने बहुचर्चित जिस्म-२मधील एका गाण्याचा अनसेंसॉर्ड व्हिडिओ इंटरनेटवर प्रसारीत करून वाद ओढावून घेतला आहे. सेंसॉर बोर्डाने या व्हिडिओला ‘ए सर्टिफिकेट’ देऊन टीव्हीवर हे गाणं दाखवण्यास मनाई केली आहे.

Updated: Jun 29, 2012, 08:12 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

बॉलिवूड दिग्दर्शिका पूजा भट्टने बहुचर्चित जिस्म-२मधील एका गाण्याचा अनसेंसॉर्ड व्हिडिओ इंटरनेटवर प्रसारीत करून वाद ओढावून घेतला आहे. सेंसॉर बोर्डाने या व्हिडिओला ‘ए सर्टिफिकेट’ देऊन टीव्हीवर हे गाणं दाखवण्यास मनाई केली आहे.

 

जिस्म-२च्या गाण्याचा हा व्हिडिओ अपलोड करताना ट्विटरवर पूजा भट्टने लिहिलं आहे “असं पहिल्यांदाच घडलं आहे की एका मुख्य धारेतल्या सिनेमाने टीव्हीपेक्षा इंटरनेटला महत्व दिलं आहे. ‘जिस्म-२’मध्ये ६ गाणी आहेत. यातील ३ गाणी व्हीवर पाहाण्यायोग्य आहेत. मात्र ३ गाणी प्रौढांसाठी असून जेव्हा इच्छा होईल तेव्हा इंटरनेटवर पाहू शकतात.”

 

इंटरनेटवर जिस्म-२च्या अपलोड केलेल्या गाण्यात कॅनडाची पॉर्न स्टार सनी लियॉन अंघोळ करताना दाखवण्यात आली आहे. यामध्ये ती अत्यंत उद्दिपीत करणारे विभ्रम करत आहेत. या गाण्यात सनीसोबत रणदीप हूडा आणि अरुणोदय सिंगसुद्धा आहेत. काल रात्रीच अपलोड केलेल्या या व्हिडिओला आज सकाळपर्यंत ५००० हून अधिक लोकांनी पाहिलं आहे.

Tags: