औरंगाबाद : आयुक्त आणि नगरसेवकांमध्ये वाद

औरंगाबादेत महापालिका आयुक्त आणि नगरसेवकांमध्ये चांगलाच वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालीय. आयुक्त अकार्यक्षम असल्याचा आरोप करत, काही नगरसेवकांनी आयुक्तानांच हटवण्याची मागणी केली आहे.

Updated: Jan 13, 2012, 08:12 PM IST

विशाल करोळे, www.24taas.com, औरंगाबाद

 

 

औरंगाबादेत महापालिका आयुक्त आणि नगरसेवकांमध्ये चांगलाच वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालीय. आयुक्त अकार्यक्षम असल्याचा आरोप करत, काही नगरसेवकांनी  आयुक्तानांच हटवण्याची मागणी केली आहे. तर आयुक्तानीही पलटवार करत नगरसेवकचं काम करु देत नसल्याचा आरोप केला आहे.

 

विकासकामांचा ठणठणाट पण वादाचे राजकारण मात्र जोरात, असच काहीसं चित्र औरंगाबाद महानगरपालिकेत पहायला मिळत आहेत. गेले काही दिवस नगरसेवकांमध्ये आपआपसात दिसत असलेला हा वाद आता आयुक्त आणि नगरसेवक असा रंगू लागला आहे.  काही नगरसेवकांनी आयुक्ताना हटवण्याची मागणी करणारे पत्र महापौरानं पाठवलं.  हे पत्र आयुक्ताना मिळताच त्यानी नगरसेवकांचा समाचार घेत विकासकाम अडल्याचे खापर नगरसेवकांच्या माथ्यावर फोडलं आहे. आयुक्तांच्या या हल्ल्यानंतर नगरसेवकांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला. महापौर अनिता घोडेले आणि उपमहापौर प्रशांत देसरडा यांनीही आयुक्तांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं.

 

विकासकामाअभावी शहराचा अवस्था बिकट होत चाललीय. पाणी असो वा रस्ते, औरंगबादकरांचे हाल सुरुच आहेत. आणि यात आता नगरसेवक आणि आयुक्त यांच्या वादानं विकासकामांचा बॅकलॉग कोण भरुन काढणार हाच खरा प्रश्न आहे.

 

[jwplayer mediaid="28793"]