मुंबई : मुंबईतल्या एका सोसायटीतला अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दखल घेत तातडीने अपघात करणाऱ्या महिलेचा शोध घेतला... मुंबईतल्या दिंडोशी विभागातल्या सद्गुरु कॉम्प्लेक्समध्ये २४ सप्टेंबरला संध्याकाळी हा अपघात झाला...ज्यात फुटबॉल खेळणाऱ्या मुलाच्या अंगावरून चक्क महिलेने आपली कार नेली होती.
दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी शोध घेऊन महिलेला अटक केलीय. या महिलेचं नाव श्रद्धा चंद्राकर असून त्याच कॉम्पेक्समधली ती रहिवाशी आहे.
३३७ कलमांतर्गत श्रद्धावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.