मुंबई : शेतकरी आंदोलनानंतर एक शब्द पुन्हा-पुन्हा चर्चेला येत आहे, तो म्हणजे सुकाणू- सुकाणू समिती यावरून अनेकांना प्रश्न पडला आहे, सुकाणू म्हणजे नेमकं काय? तर ढोबळमानाने जर पाहिलं तर सुकाणू म्हणजे जहाजाला दिशा देण्यासाठी ज्या गोल चाकासारख्या स्टेअरिंगचा वापर होतो, तो म्हणजे सुकाणू.
सुकाणू अगदी जहाजाच्या मध्यभागी असतो. सुकाणूमुळे विपरीत परिस्थिती अथवा गरजेनुसार जहाजाची दिशा बदलली जाते, प्रवाहापासून जहाजाची दिशा बदलण्यासाठी सुकाणूचा वापर होतो.
शेतकरी आंदोलनावर शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर शेतकरी आणि शेती विषयाशी संबंधित ज्या संघटना आहेत, त्यातील बहुतांश समित्यांमधील एक-एक सदस्यांची एक सुकाणू समिती बनवण्यात आली आहे. अर्थात नावानुसार या सुकाणू समितीला आता शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा, तसेच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काय उपाय-योजना करता येतील, त्या देखील सूचवायच्या आहेत.