Sonu Nigam Attacked: '...नाहीतर आज खेळ खल्लास होता', कॉन्सर्टवेळी नेमकं काय झालं? सोनू निगमने सांगितला घटनाक्रम!

Sonu Nigam Attacked: चेंबुर (Chembur) येथे आयोजित कार्यक्रमानंतर मोठा गोंधळ उडाल्याचं पहायला मिळालं. सोनू निगमसोबत सेल्फीचा घेण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली. त्यावेळी...

Saurabh Talekar Updated: Feb 21, 2023, 11:40 AM IST
Sonu Nigam Attacked: '...नाहीतर आज खेळ खल्लास होता', कॉन्सर्टवेळी नेमकं काय झालं? सोनू निगमने सांगितला घटनाक्रम! title=
Sonu Nigam

Sonu Nigam Attacked: चेंबुर (Chembur) येथे आयोजित करण्यात आलेल्या लाईव्ह कॉन्सर्टवेळी (Live Concert) लोकप्रिय गायक सोनू निगम (Sonu Nigam) याला धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली.  याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सोनू निगमच्या कार्यक्रमात गोंधळ झाल्याने एकच गोंधळ उडाला आहे. सेल्फी घेण्यासाठी धडपड सुरु असताना सोनू निगम याचा सहकारी रब्बानी खान (Rabbani Khan) हा जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. अशातच आता खुद्द सोनू निगमने या प्रकरणावर भाष्य केलंय. (Sonu Nigam records his statement at Chembur police station regarding the Attacked that took place at his live concert)

नेमकं काय झालं?

सोमवारी मुंबईतील चेंबूर येथे सोनू निगमचा संगीत कार्यक्रम म्हणजे लाईव्ह कॉन्सर्ट (Sonu Nigam Live Concert)आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. कार्यक्रम रंगतदार झाला. मात्र, कार्यक्रमानंतर मोठा गोंधळ उडाल्याचं पहायला मिळालं. सोनू निगमसोबत सेल्फीचा घेण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली. त्यावेळी सोनू निगम व त्याचे काही सहकारी मंचावरुन खाली उतरत असताना त्यांना धक्काबुक्की (Sonu Nigam Attacked) करण्यात आली. त्याचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होताना दिसत आहे.

काय म्हणाला Sonu Nigam?

मला सेल्फी घ्यायचा असं सांगण्यात आलं. मी नकार दिल्यानंतर समोरच्या व्यक्तीनं मला पकडलं, त्यावेळी स्वप्नील प्रकाश फातर्फेकर (Swapnil Prakash Phapankar) नामक एका व्यक्तीने मला जबरदस्तीने जोरात खेचलं. त्यावेळी माझा मित्र माझ्या मदतीला आला. त्याने माझ्या टीममधील हरी आणि रब्बानीला धक्काबुक्की केली. त्यावेळी मलाही तोल सांभाळता आला नाही. मी देखील पायऱ्यांवरून खाली पडलो, असं सोनू निगमने (Sonu Nigam) सांगितलं आहे.

आणखी वाचा - एकेकाळी ट्रेनने प्रवास करणार सोनू निगम आहे एवढ्या कोटींचा मालक

पाहा Video - 

दरम्यान, रब्बानींनी मला वाचण्यासाठी आले. तर त्याने जोरात धक्का दिला आणि ते मागे आदळले. नशिब म्हणून ते थोडक्यात वाचले, नाहीतर जीवच गेला असता. त्यांच्या मागे लोखंड असतं, तर त्यांचा मृत्यू झाला असता. ते महागात पडलं असतं, असं सोनू निगम (Sonu Nigam On live concert Accident) म्हणाला आहे.

सोनू निगमसोबत ही घटना घडल्यानंतर आता तो मुंबई विमानतळावर (Sonu Nigam Spotted At Mumbai Airport) दिसून आला. त्यावेळी त्याने सर्व कॅमेरामॅनला स्माईल दिली आणि ऑल ओके असं म्हटलं. 

पृथ्वी शॉवर देखील झाला होता हल्ला-

पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि त्याचा मित्र क्लबमध्ये गेले होते. यावेळी काही चाहत्यांसोबत हा वाद सुरु झाला. या प्रकरणात महिला चाहतीने पृथ्वी शॉकडे सेल्फी घेण्याचा आग्रह धरला होता. यादरम्यान एकदा सेल्फी घेतल्यानंतर चाहती आणि तिच्या मित्रांनी अजून एक सेल्फी घेण्यासाठी आग्रह धरला होता. त्यावेळी मोठा राडा झाल्याचं पहायला मिळालं होतं. त्यावेळी नकार पचवता न आल्याने मोठा गोंधळ उडाला होता.