मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर ब्रीचकॅण्डी रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. आज त्यांना ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पवारांना पोटदुखीचा त्रास वाढल्यानं त्यांच्यावर मुंबईतील तातडीनं शस्त्रक्रीया करण्यात आली होती. त्यांच्या पित्ताशयात झालेले खडे शस्त्रक्रियेमधून यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आले.
सध्या पवारांची प्रकृती स्थिर असून, आज त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.
आदरणीय खा. @PawarSpeaks साहेबांची आज डॉक्टरांनी तपासणी केली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. आज त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते ना. @nawabmalikncp यांनी दिली. https://t.co/FcZIgu5bYc
— NCP (@NCPspeaks) April 3, 2021