Sanjay Raut, Narayan Rane : केंद्रीयमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राणे यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बदनामीचा दावा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी राणेंनी राऊतांविरोधात वक्तव्य केलं होतं. ( Political News) संजय राऊत हे आपल्यामुळे खासदार झाले. त्यासाठी आपण पैसे खर्च केले असा दावा राणे यांनी केला होता. त्यामुळे बदनामी झाल्याचा आरोप करत राऊतांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे. (Sanjay Raut issued a legal notice to Narayan Rane)
काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी संजय राऊत माझ्यामुळे खासदार झालेत, त्यासाठी मी पैसे खर्च केल्याचा दावा केला होता. यावरुन राऊत यांनी राणे यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. आपली बदनामी झाल्याचा दावा या नोटीस द्वारे करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे जवळचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राणे यांना कायदेशीर नोटीस (Legal Notice) पाठवल्याने राऊत आणि राणे यांच्यातील वाद आता अधिक रंगणार आहे. राणे मागील काही महिन्यांपासून राऊत यांच्यावर तीव्र शब्दांत टीका करत आहेत. राणे यांनी संजय राऊत यांच्यावर वेळोवेळी अनेक आरोपीही केले आहेत. या आरोपांवरुनच राऊत यांनी राणे यांना थेट आव्हान देत नोटीस बजावत आता कोर्टात खेचले आहे.
नारायण राणे सार्वजनिक मंचावरून तसेच माध्यमातून माझ्याविषयी आणि शिवसेने बाबत बिनबुडाचे आरोप करीत असतात.हे आरोप त्यांनी सिध्द करावेत. अन्यथा माफी मागावी.माझे वकील सार्थक शेट्टी यांच्या मार्फत मी त्यांना कायदेशीर कारवाई बाबत नोटीस बजावली आहे.
कर नाही तर डर कशाला?जय महाराष्ट्र!
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 3, 2023
राऊत यांनी राणे यांना कायदेशीर नोटीस बजावल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली. राऊत यांनी आपल्या ट्विमध्ये म्हटलेय, राणे सार्वजनिक मंचावरुन तसेच माध्यमातून माझ्याविषयी आणि शिवसेनेबाबत बिनबुडाचे आरोप करीत आहेत. हे आरोप त्यांनी सिध्द करावेत. अन्यथा माफी मागावी. माझ्या वकीलांमार्फत मी त्यांना कायदेशीर कारवाईबाबत नोटीस बजावली आहे. याच ट्विटमध्ये राऊत यांनी कर नाही तर डर कशाला,असा सवालही केलाय.
राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका केली आहे आणि करत आहेत. त्यामुळे राणे आणि शिवसेना यांच्यात संघर्ष जुना आहे. राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तेव्हापासून शिवसेना आणि राणे यांच्यातून हा संघर्ष कायम आहे. तसेच राणे पुत्रांकडूनही शिवसेना आणि उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करण्यात येत आहे. राणे आता भाजपमध्ये आहेत. राणे आणि त्यांच्या मुलांकडून सातत्याने संजय राऊत यांच्यावर टीका करण्यात येत आहे.