मुंबई : संभाजी भिडेंच्या मुंबईतील व्याख्यानाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. लालबागमध्ये रविवारी संभाजी भिडेंचं जाहीर व्याख्यान होणार होतं. मात्र, सुरक्षेच्या कारणावरुन पोलिसांनी या व्याख्यानाला परवानगी नाकारण्यात आली आहे. भीम आर्मी या सघटनेनं संभाजी भिडेंच्या या कार्यक्रमाला विरोध केला होता.
दरम्यान ७ डिसेंबर रोजी शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडेंना सशर्त जामीन मंजूर झालाय. नाशिकच्या जाहीर सभेत आंबा खाल्ल्यानं मुले होतात असा अजब दावा संभाजी भिडेंनी केला होता. गेल्या सहा महिन्यांपासून न्यायालयानं वॉरंट बजावूनही संभाजी भिडे हजर होत नव्हते. गेल्या आठवड्यात न्यायालयासमोर हजर झाल्यानंतर त्यांना १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यासह जामीन मंजूर करण्यात आला.