वर्सोव्यात स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून हॉटेलची तोडफोड

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी रात्री मुंबईतल्या वर्सोवा इथं निषेध मोर्चा नेत हॉटेलची तोडफोड केली. 

Updated: Jan 11, 2018, 04:22 PM IST
वर्सोव्यात स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून हॉटेलची तोडफोड title=

मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी रात्री मुंबईतल्या वर्सोवा इथं निषेध मोर्चा नेत हॉटेलची तोडफोड केली. 

या हॉटेलमध्ये सर्रास हुक्का पार्लर सुरु असल्याचा आरोप करत स्वाभिमान पक्षाचे ३०-४० कार्यकर्ते हॉटेलमध्ये घुसले आणि घोषणाबाजी करत त्यांनी हॉटेलची तोडफोड केली. 

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. विशेष म्हणजे मुंबईत पूर्णपणे हुक्काबंदी असतानाही शहरात सर्रास हुक्का पार्लर चालवले जात आहेत. 

या विरोधात हुक्काला मार बुक्का असं आंदोलनच नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षाने सुरु केलं आहे. त्याकरता सोशल मिडायावरही जोरदार कॅम्पेन सुरु करण्यात आलं आहे.