मुंबई : पालघर प्रकरणी (Palghar incident) १०१ जणांना अटक करण्यात आली आहे. पालघरचा संपूर्ण तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला असून घटना झाल्यानंतर ८ तासांतच १०१ जणांना अटक केली. त्या १०१ जणांची यादी आज जाहीर करत असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. अनिल देशमुख यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी पालघरमधील घटनेला जातीय रंग देणं दुर्दैवी असल्याचं म्हटले आहे.
पालघर येथील घटनेत अटक झालेल्या १०१ जणांची यादी इथे सार्वजनिक करण्यात येत आहे. जी विघ्नसंतोषी मंडळी या घटनेला धार्मिक रंग देण्याचा सातत्याने प्रयत्न करत होती, त्यांनी नक्की पहावी...#ZeroToleranceForCommunalism#LawAndOrderAboveAll pic.twitter.com/pjouXo9NhQ
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 22, 2020
हल्लेखोर मंडळी जंगलातून पळून जाण्याचा आणि लपण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, पोलिसांनी या सगळ्यांना पकडले आहे. पकडण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये एकही मुस्लिम समाजाचा कोणीही नाही, असे स्पष्टीकरण गृहमंत्री देशमुख यांनी दिले. असे असताना सुद्धा या घटनेला धार्मिकतेचा रंग देण्याचा प्रयत्न झाला, ही बाब अंत्यत गंभीर आणि दुर्दैवी आहे. आ ज संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाशी लढा देत आहेत. मात्र, यातही काहीजण राजकारण करत आहेत. हे चुकीचे आहे. सगळ्यांनी कोरोनाशी सामना केला पाहिजे, असे ते म्हणालेत.
दरम्यान, वाधवान कुटंबीयांचा क्वारंटाईन कालावधी आज दुपारी दोन वाजता संपत आहे. त्यामुळे पोलीस खात्याकडून ईडी आणि सीबीआयला त्यांना ताब्यात घेण्यासंदर्भात पत्र लिहिल्याची माहितीही त्यांनी दिली. पालघरला जी घटना घडली ती चोर आले या अफवेतून घडली. यासंदर्भात उच्चस्तरीय चौकशी चालू आहे. यासंदर्भात तथ्यांची तसेच समाजमाध्यमांतील व्हायरल पोस्ट आणि संदेशांची पडताळणी केली आहे.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 22, 2020