मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणासाठी भूमीपूत्र आक्रमक झालेत. मुख्यमंत्र्यांसह वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय कृती समितीचे म्हणणे न ऐकताच मुख्यमंत्री निघून गेल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे येत्या 24 तारखेला सिडकोला घेराव घालण्याचे आंदोलन होणारच असा पवित्रा कृती समितीने घेतलाय. पोलिसांनी परवानगी दिली नाही तरी शांततेच्या मार्गाने हे आंदोलन होणार असा निर्धार सदस्यांनी व्यक्त केला.
नवी मुंबई विमानतळ नामकरण वादात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यांनी देखील त्यांची भूमिका मांडली आहे. विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव असावं असं मत राज ठाकरेंनी मांडलंय. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आल्यावर बाकी कुठलेही नाव हा वादाचा विषय होऊ शकत नाही असं म्हणत भाजप नेते प्रवीण दरेकरांनी याला पाठिंबा देऊ केलाय.
दुसरीकडे विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा जी आर निघाला असल्यामुळे वाद नको, अशी भूमिका शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी मांडलीये.