Mumbai Trans Harbour Link : मुंबई ही एक झगमग मायानगरी...मुंबईचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे वाहतूक कोंडी...या वाहतूक कोंडीमुळे मुंबईकरांचा दिवसातील जास्त जास्त वेळ हा ट्ऱॉफिकमध्ये जातो. नवी मुंबई आणि पुण्यातून असंख्य लोक मुंबईत कामानिमित्त येतात. पण हा प्रवास रोजचा अतिशय त्रासदायक असतो. आता लवकरच हा वेळ कमी होणार आहे. या वर्षाच्या शेवटी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पामुळे मुंबई ते नवी मुंबई गाठता येणार फक्त 20 मिनिटात तर मुंबई ते पुणे प्रवासही 90 मिनिटात होणार आहे.
हा देशातील सर्वात मोठा सागरी पूल म्हणून नावालोकाला आला आहे. मुंबई पारबंदर प्रकल्पामध्ये मुंबई शहरातील शिवडी आणि न्हावा यांना जोडणाऱ्या सुमारे 22 किमी लांबीच्या 6 पदरी पूल आहे. तर या पुलाची समुद्रातील लांबी 16.5 किमी तर जमिनीवरील पुलाची लांबी सुमारे 5.5 किमी आहे. (mumbai trans harbour link now travel from mumbai to pune Instagram video Google Trending News today)
एम एम आर डी ए असा विश्वास दर्शविला आहे की, हा पूल सुरु झाल्यावर साधारण रोज या पुलावरुन 70000 वाहने भरधाव वेगाने जातील. या पुलामुळे नवी मुंबईतील लोकांना फायदा होणार आहेच त्याचासोबतच पुणेकरांनाही याचा फायदा होणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा NH 348 या नॅशनल हायवेला जोडला जाईल.
या पुलासाठी एमएमआरडीएने 18000 कोटी रुपयांचा खर्च केला असून या वर्षांच्या शेवटी या पुलाचं लोकापर्ण होणार आहे, असं सांगण्यात येतं आहे.
या पुलामुळे नवी मुंबई विमानतळ (navi mumbai airport), मुंबई पोर्ट आणि जवाहरलाल नेहरू पोर्टशी वेगवान दळणवळण होणार आहे.
मुंबई आणि नवी मुंबई, रायगड, मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई गोवा महामार्ग यांच्यामधील अंतर सुमारे 15 किमी कमी होणार आहे.