कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबई महानगगरपालिकेतर्फे आता शहराच्या विविध भागांमध्ये वॉटर एटीएमची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. गर्दीच्या ठिकाणी हे वॉटर एटीएम असतील. यामुळे अवघ्या १ रुपयात १ लीटर पिण्याचं शुद्ध पाणी मिळणार आहे.
सध्या मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांवर वॉटर एटीएम सुरू आहेत. त्याच धर्तीवर मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून शहरात वॉटर एटीएम बसवली जाणार आहेत. प्रायोगिक तत्वावर २ ठिकाणी ही योजना सुरु केली जाणार असून, ती यशस्वी झाल्यावर संपूर्ण मुंबईत मग वॉटर एटीएमची संख्या टप्प्याटप्याने वाढवली जाईल.
वॉटर एटीएम बसवणं आणि चालवण्यासाठी मुंबई महानगरपालिका निविदा काढत आहे. पालिका जागेची निवड करून ती संबंधितांकडे भाडेतत्वावर सुपूर्द करेल. पर्यटकांची आणि मुंबईकरांची वर्दळ असणारे भाग वॉटर एटीएमसाठी निवडले जाणार आहेत. यासाठी व्यावसायिक दराने पाणीपुरवठा केला जाईल. तर शुद्ध पाण्याचा दर १ रुपयात १ लीटर असा असणार आहे.
१ लीटरच्या बाटलीबंद पाण्यासाठी लोकांना तब्बल २० रुपये मोजावे लागतात. त्यामुळे पालिकेची १ रुपयात १ लीटर शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा, नागरिकांसाठी वरदानच ठरणार आहे.
मुंबईतल्या विविध भागातल्या रस्त्यांवर अजूनही जुने प्याऊ पाहायला मिळतात. पूर्वी मुंबईकरांची तहान भागवणारे हे प्याऊ नंतरच्या काळात डागडुजी अभावी बंद पडले. अशा परिस्थितीत सध्या काही ठिकाणच्या प्याऊचा हेरिटेज दर्जा जपण्याचा प्रयत्न केला जातोय.
<iframe allow="accelerometer; autoplay; encrypted-media; gyroscope; picture-in-pictu