Crime News : गेल्या काही दिवसांपासून बनावट फोनकॉलद्वारे फसवुणीकीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पोलिसांनी धडक कारवाईला सुरुवात केली आहे. अशाच एका कारवाईत पुण्याच्या दत्तवाडी पोलिसांनी मुंबईत कारवाईत करत एक कॉल सेंटर उद्धवस्त केले आहे. या कॉल सेंटर मधून फेक कॉलद्वारे लोकांना लुटलं जात होतं. मुंबईच्या मुलुंडमध्ये हे कॉल सेंटर सुरु होते. पोलिसांनी यावेळी कॉल सेंटरमधून 40 मोबाईल, 7 हार्ड डिस्क व इतर साहित्य जप्त केले आहे.
नामांकित कंपनीमधून बिनव्याजी कर्ज देतो असे सांगून फसवणूक करणारे अनोळखी क्रमांकावरुन फोन करत असत. bajaj finserv नावाच्या कंपनीच्या नावाने ही लूट सुरु होती. पुणे पोलिसांकडे याची तक्रार येताच त्यांची या कॉल सेंटरचा शोध घेतला. त्यानंतर पोलिसांनी गुरुवारी रात्री धाड टाकत या कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. 43 कर्मचाऱ्यांमार्फत हे कॉल सेंटर चालवले जायचं. याच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाची उलाढाल व फसवणूक केली जात होती.
"कॉल सेंटरवर धाड टाकली तेव्हा तिथे 43 मुले आणि मुली फसवणुकीचेच काम करत होते. त्यांना ग्राहकांसोबत बोलण्यासाठी एक स्क्रिप्ट दिली जात होती. बोलण्यात ती व्यक्ती गुंतली की कर्मचारी फसवणूक करण्यासाठी तयार केलेले लिंक ग्राहकाला पाठवत होते. त्याद्वारे ग्राहकांची फसवणूक केली जात होती," अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.