यांना आवरा? लेडिज डब्यात तरुणाची नशेबाजी, तर दरवाजात लटकून खतरनाक स्टंटबाजी

मुंबईच्या लोकल ट्रेनमधील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. लोकलच्या महिला डब्ब्यात एक तरुण चक्क नशा करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तर दुसऱ्या एका घटनेत दोन तरुण चालत्या ट्रेनमध्ये दरवाजाला लटकून खतरनाक स्टंटबाजी करताना दिसत आहेत. 

राजीव कासले | Updated: Oct 23, 2023, 05:45 PM IST
यांना आवरा? लेडिज डब्यात तरुणाची नशेबाजी, तर दरवाजात लटकून खतरनाक स्टंटबाजी title=

Mumbai Local : मुंबईत लोकल ट्रेनमधील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. हार्बर लाईन मार्गावर लोकलमध्ये (Mumbai Local) एका तरुणीवर बलात्काराची घटना ताजी असतानाच मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये एक तरुण नशा करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Video Viral) वायरल होतं आहे. धक्कादायक म्हणजे हा तरुण महिलांच्या डब्ब्यात दरवाजावर उभं राहून तो नशा करताना दिसतोय. अंगाला लावायचा बाम तसंच व्हाईटनरची बाटली फोडून ती रुमालात टाकून तोंडाने खेचयची नशा करणारे तरुण स्काय वॉक, रेल्वे पूलाखाली तसेंच रस्त्याकडेला पाहायला मिळतात. मात्र चक्क ट्रेन मध्ये महिलांच्या डब्ब्यात उभं राहून हा तरुण नशा करताना दिसत असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. सोशल मीडियावर वायरल हा व्हिडीओ नेमका कुठला आहे ते मात्र समजू शकलेले नाही.

तरुणांचं खतरनाक स्टंटबाजी
दुसऱ्या एका घटनेत दोन तरुण चालत्या लोकलच्या दरवाजाला लटकून खतरनाक स्टंटबाजी (Stunt) करताना दिसत आहेत. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तरुणांच्या या स्टंटबाजीवर लोकांनी संताप व्यक्त केला आहे. व्हायरल होणारा व्हा व्हिडिओ मुंबई लोकलचा असल्याचं सांगितलं जात आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एक तरुणा धावत चालती लोकल पकडताना दिसत आहे. तर दुसऱ्या एका तरुणाने हाताने लोकलच्या दरवाजातला दांडा पकडला असून दोन्ही पाय धावत्या लोकलबाहेर काढून स्टंटबाजी करतना दिसत आहे. प्लॅटफॉर्मवर दोन्ही पाय घसटत हे तरुण स्टंटबाजी करतायत. प्लॅटफॉर्म संपत असतानाच हे दोन्ही तरुण लोकलमध्ये चढतात. 

प्रवाशांनी केली कारवाईची मागणी
तरुणांची ही स्टंटबाजी सोशल मीडियावर व्हायरल झाली असून लोकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अशा तरुणांनामुळे इतर प्रवाशांच्या जीवालाही धोका पोहोचू शकतो. या तरुणांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. काही युजर्सने हा व्हिडिओ रेल्वे पोलिसांना टॅग केला आहे. तर युजरने लिहिलंय, रिल बनवण्यासाठी सध्याची तरुण पिढी कोणतंही धाडस करायला तयार असंत. काही युजर्सने तर यांना युद्धात पाठवू द्या असाही सल्ला दिला आहे. 

लोकलमध्ये तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न
याचवर्षातल्या जून महिन्यात हार्बर लोकलमध्ये एका तरुणीवर बलात्काराची धक्कादायक घटना घडली होती. पीडित तरुणीने छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती टर्मिनसवरु सकाळी 7.27 ची लोकल पकडली. डब्यात फक्त एक वयोवृद्ध महिला होती. ट्रेन सुरु होताच एका तरुणाने धावत त्या डब्यात चढला. सीएसटीएम ते मस्जिद स्थानकादरम्यान आरोपीने त्या मुलीबरोबर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने मुंबईतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. याप्रकरणी आरोपी पी नवाझु करीमला (40) अटक करण्यात आली. तो हमाल म्हणून काम करतो, अशी माहिती पोलिसांनी दिली.