Market at all time high: शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आठवड्याची सुरुवात अगदी दणक्यात झाली आहे. आज दिवसाचा व्यवहार सुरु झाला तेव्हा शेअर बाजाराने नवा सर्वोच्च सर्वकालीन उच्चांक गाठल्याचं पहायला मिळालं. आज सेन्सेक्सनं 65 हजार 168 ची पातळी गाठली. तर निफ्टीनेही 19 हजार 318 अंकांपर्यंत उसळी घेतली. मागील आठवड्यात शेअर बाजाराने प्रस्थापित केलेला विक्रम या कामगिरीमुळे मोडीत निघाला आहे. सेन्सेक्समध्ये 118 अंकांनी वाढ जाली तर निफ्टीनेही 57 अंकांनी उसळी घेत 19300+ चा टप्पा गाठला. सुरुवातीच्या ट्रेण्ड्सनुसार टॉप 30 शेअर्सपैकी शेअर बाजारातील 21 मोठ्या शेअर्स वधारले आहेत तर 9 शेअर्स तोट्यात आहेत.
मागील काही दिवसांपासून घरगुती गुंतवणूकादारांनी मोठ्याप्रमाणात खरेदी केल्याने शेअर बाजाराला 'अच्छे दिन' आल्याचं पहायला मिळत आहे. जागतिक स्तरावरील अनेक शेअर बाजारांमध्ये पडझड सुरु असतानाच भारतीय शेअर बाजारामधील सकारात्मकता ही घरगुती आणि छोट्या गुंतवणूकदारांमुळे असल्याचं तज्ज्ञ सांगतात. भारतीय गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात खरेदी करत असल्याने शेअर बाजार वधारल्याचं सांगितलं जात आहे. पुढील बराच काळ हा ट्रेण्ड कायम राहील असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच बाजारातील या सकारात्मक घडामोडींमुळे परदेशी गुंतवणूकदारही भारतीय बाजारपेठेकडे वळतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
शेअर बाजारात सकारात्मक वाढ होण्यासंदर्भातील कारणांबद्दल बोलायचं झालं तर प्रामुख्याने कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने बाजाराला आधार मिळाल्याचं सांगितलं जात आहे. तसेच देशातील महागाई कमी झाल्याने शेअर बाजाराला आधार मिळाल्याचं सांगितलं जात आहे. घरगुती गुंतवणूकादारांनी भारतीय बाजारपेठेवर विश्वास दाखवल्याने विदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारपेठेत गुंतवणूक वाढवत असल्याचं चित्र दिसत आहे. भारतीय गुंतवणूकादारांमुळे शेअर बाजारामध्ये सकारात्मक वाढ असतानाच दुसरीकडे परदेशी गुंतवणूकदारही भारतीय बाजारपेठेकडे आकर्षित होत असल्याने शेअर बाजाराला दुहेरी फायदा मिळत आहे. भारताच्या परकीय चलन साठ्यात वाढ झाल्यानेही बाजाराला बळ मिळत असल्याचं सांगितलं जात आहे. यंदा वर्षभरामध्ये भारतीय शेअर बाजारात मोठी वाढ पहायला मिळाली आहे. वर्षाच्या सुरुवातीला सेन्सेक्स 61 हजारांच्या थोडा वर होता. सध्या शेअर बाजाराने 65 हजारांहून अधिकचा टप्पा गाठला आहे. म्हणजेच पहिल्या 6 महिन्यांमध्ये भारतीय शेअर बाजाराने 6 टक्क्यांची उचल खल्ली आहे.
इन्फोसिस (INFY)
भारत फोर्ज (BHARATFORG)
फेडरल बँक (FEDERALBNK)
हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)
सनफार्मा (SUNPHARMA)
महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)
इंडसइंड बँक (INDUSINDBK)
बंधन बँक (BANDHANBNK)
पर्सिस्टंट (PERSISTENT)
एमफॅसिस (MPHASIS)