मुंबई : देशात कोरोना विषाणूचा संसर्ग (Corona in India) झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्र सर्वात जास्त कोरोना रुग्ण आढळत आहेत. संक्रमणाची गती रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी 'ब्रेक द चेन' मोहीम (Break The Chain) सुरू केली. या अंतर्गत अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. जे आज 14 एप्रिलपासून अंमलात येणार आहेत.
महाराष्ट्राची राजधानी मुंबई देखील कोरोना संसर्गाच्या विळख्यात अडकली आहे. दरम्यान, मुंबई नागरी प्रमुख आयएस चहल यांनी सांगितले की, 'घर काम करणाऱ्यांना ये-जा करण्याची परवानगी दिली जाणार आहे. त्यांना निर्बंधांमधून वगळले जाईल.' या कालावधीत जे लोक घरकाम करतात त्यांना प्रवास आणि नोकरी करण्याची मुभा दिली जाईल असे चहल यांनी सांगितले.
मुंबईकरांसाठी आदेश अधिक स्पष्टपणे सांगितले जातील. या कालावधीत कोणती कामे किंवा सेवा खुल्या राहू शकतात हे आम्ही सांगू. 'ब्रेक द चेन' रात्री आठ वाजल्यापासून लागू केली जाईल. त्यापूर्वी आम्ही आपले आदेश जारी करू, असे काकाणी म्हमाले.
-सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सार्वजनिक वाहतूक सुरू
-कारण नसताना घराबाहेर पडल्यास कारवाई होणार
-रात्री 8 वाजल्यापासून निर्बंध लागणार
-लॉकडाऊन सदृश्य निर्बंध आहेत- उद्या रात्री ८ वाजल्यापासून अंमलबजावणी
-रात्रीपासून ब्रेक द चैनसाठी राज्यात संचारबंदी
-पुढील १५ दिवस संचारबंदी
- येणे जाणे पूर्ण बंद
- आवश्यक काम नसेल तर घराबाहेर पडायचे नाही
- अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद
- सार्वजनिक वाहतुक म्हणजे लोकल, बस व्यवस्था सुरू राहणार
- त्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांसाठी वापरले जाणार
- वैद्यकीय सेवा, लस उत्पादक, वैद्यकीय वाहतुक, वैद्यकीय साहित्य वाहतूक सुरू राहणार
- शीतगृह, जनावरांचे दवाखाने, शेतीची कामे सुरू राहतील
- बँका, आर्थिक संस्था, अधिस्वीकृती धारक पत्रकार सुरू राहणार
- बांधकाम साईट सुरू राहणार, तिथे काम करणारे कर्मचार्यांची तिथेच राहण्याची व्यवस्था करण्याची अट
हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद, मात्र होम डिलिव्हरी सुरू राहणार
- रस्त्यावरील खाद्यपदार्थ सेवा सुरू राहणार
लाभार्थीना ३ किलो गहु आणि दोन किलो तांदुळ एक महिना मोफत
- सात कोटी लोकांना मोफत धान्य