मुंबई: केरळ राज्यात आलेल्या महापुरामुळे संपूर्ण मसाल्याच्या पदार्थांची शेतीच नष्ट झालीये. याचा फटका आता मसाला पदार्थांच्या निर्यातीवर होत आहे.
नवी मुंबई एपीएमसी मधील घाऊक मसाला मार्केट मध्ये केरळ राज्यातून मोठ्या प्रमाणात मसाल्याचे पदार्थांची आवक होते. मात्र केरळ मधील आपत्ती मूळे उत्पादनात घट झाल्याने मसाल्याच्या पदार्थांची दर प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. यामध्ये लवंग इलायची काळीमिरी दालचिनी यापदार्थासह चहाचा समावेश आहे.
या पदार्थांचे दर प्रतिकिलो तब्बल २५ ते ३० टक्क्यांनी वाढलेत.. याची झळ सामान्य नागरीकांना बसताना दिसत आहे.