मुंबई : १२ मार्च १९९३ला मुंबईत झालेल्या साखळी स्फोट प्रकरणी विशेष टाडा न्यायालयात ७ सप्टेंबरला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. हा या प्रकरणातला शेवटचा खटला आहे.
सातपैकी मुस्तफा डोसा याचं निधन झालंय. अबू सालेम, फिरोज खान, ताहेर मर्चंट, रियाझ सिद्दिकी आणि करीमुल्ला शेख यांना १६ जून रोजी कोर्टानं दोषी ठरवलं होतं. तर अब्दुल कय्यूमला न्यायालयानं दोषमुक्त केलंय. या स्फोटात २५७ नागरिकांचा मृत्यू झाला होता तर ७१३ जण जखमी झाले होते.
यातील एक दोषी मुस्तफा डोसा याला सीबीआयने फाशीची मागणी केली होती. पण शिक्षेच्या युक्तीवादादरम्यानच त्याचा मृत्यू झाला होता. तर यातला सातवा आरोपी अब्दुल कय्यूम याची कोर्टाने निर्दोष म्हणून मुक्तता केली होती.