अंकुर त्यागी, झी मीडिया, मुंबई : भारतात चोरी झालेल्या Mobile फोन्सचा वापर दहशतवादी कारवायांसाठी (Terrorist Activities) होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. भारतातून मोबाईल फोन चोरी करायचे, ते पाकिस्तानला (Pakistan) पाठवायचे, त्याच्याशी छेडछाड करायची आणि देश अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारत अस्थिर करण्यासाठी डी गँगनं (D Gang) आता आपला फोकस भारतात चोरी होणाऱ्या मोबाईल फोनकडे वळवलाय. NIA, IB, CUSTOMS, मिलिट्री इंटेलिजन्स विभागाची उच्चस्तरीय बैठक झाली, या बैठकीत चोरी झालेले मोबाईल डी गँग कशी वापरते याचा पर्दाफाश झाला. तुम्ही विचारही करु शकणार नाही अशी ट्रीक डी गँग वापरतेय आणि तीही तुमचे मोबाईल चोरुन. (Dawood Gang supplies stolen phones to terrorists)
भारतात चोरी, पाकिस्तानातनं कुरापती
भारतात चोरी होणारे मोबाईल्स बांगलादेशात (Bangladesh) पाठवले जातात. बांगलादेशातून हेच मोबाईल पाकिस्तानात पोहचवले जातात. पाकिस्तानातले टेक्नो एक्स्पर्ट (Techno Expert) मोबाईलच्या IMEI नंबरशी छेडछाड करतात. एकाच IMEI नंबरवरुन 40 ते 50 मोबाईल्स एकाचवेळी अॅक्टीव्ह होतात. याच फोनचा वापर करुन खंडणी, ड्रग्स, टेरर फंडिंग, अतिरेकी कारवाया, बनावट चलन, हवाला असे काळेधंदे दाऊद गँग (Dawood Ibrahim) करतेय
खुद्द मुंबई क्राईम ब्रँचकडून (Mumbai Police) हा गौप्यस्फोट करण्यात आलाय. काही वर्षांपूर्वी मोबाईलच्या IMEI नंबरशी छेडछाड करणाऱ्या एका व्यक्तीला मुंबईच्या पायधुनी परिसरातून अटक करण्यात आली होती. जर्मनीहून आणलेल्या सॉफ्टवेअरद्वारे तो छेडछाड करत असल्याचं समोर आलं होतं, आता खुद्द डी गँग हीच ट्रीक वापरतेय. भारत अस्थिर करायला, भारतात दहशत माजवायला. त्यामुळे भारतीय यंत्रणांसमोर नवं आव्हान उभं ठाकलंय.