मुंबई : शिवसेना आणि मुंबई महापालिका आयुक्त यांच्यात मानापमानावरून तीव्र झालेल्या लढाई सुरू झाली आहे. ॉ
आणि या लढाईत आयुक्तांनी बाजी मारत शिवसेनेला सपशेल माघार घेण्यास भाग पाडल आहे. शिवसेनेला अंधारात ठेवून बीएमसीचा मोबाईल अॅप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाँच करणा-या आयुक्तांनी शिवसेनेची नाराजी ओढवून घेतली होती. ज्याचे पडसाद सभागृहात उमटलेत.
या लाँचिंगनंतर शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी याची दखल घ्यावी अशी देखील अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. शिवसेना आणि भाजपमधील हे तू तू मैं मैं काही नवीन नाही. त्यामुळे पुन्हा एकदा या घटनेने भाजप - शिवसेना आमने सामने आहे.