मुंबई : कर्जमाफी विषयांवर निर्णय घेतांना सर्व पक्षीय सहकार्य असावे यासाठी कर्जमाफीसाठी नेमलेल्या मंत्रीगटाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे. याचा एक भाग म्हणून चंद्रकांत पाटील आज संध्य़ाकाळी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
कर्जमाफी कशी असावी, निकष काय असावेत यावर चर्चा होणार आहेत. याआधी चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण , राष्ट्र्वादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत कर्जमाफी विषयांवर चर्चा केली होती. तेव्हा आज उद्धव ठाकरे यांच्या भेटीत काय चर्चा होते, काय नवे मुद्दे पुढे येतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.