BMC Job: मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत एकूण 8 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. मुंबई महापालिकेअंतर्गत बालरोग तज्ज्ञ, मानद बाल हृदयरोगतज्ज्ञ, मानद बाल शल्यचिकित्सक, भूलतज्ज्ञ, बीएमटी फिजिशियन, ऑडिओलॉजिस्ट, सहायक वैद्यकीय अधिकारी, मुख्य परिचारिका/ परिचारिका समन्वयक याचे प्रत्येकी 1 पद भरले जाईल.
बालरोग तज्ज्ञचे 1 पद भरले जाणार असून यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून एमडी / डीएनबी (पेडियाट्रिक्स) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी पूर्ण केलेली असावी.
मानद बाल हृदयरोगतज्ज्ञचे 1 पद भरले जाणार असून यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून डीएम/डीएनबी (कार्डिओलॉजी) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी पूर्ण केलेली असावी.मानद बाल शल्यचिकित्सक पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून M.Ch पेडियाट्रिक सर्जरी किंवा एमसीआय पूर्ण केलेले असावे. भूलतज्ज्ञ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने एमडी / डीएनबी (एनेस्थिओलॉजी) पूर्ण केलेले असावे.
बीएमटी फिजिशियन पदासाठी उमेदवाराने डीएम (हेमॅटोलॉजी) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी पूर्ण केलेली असावी. यासोबतच उमेदवारांकडे फेलोशिप इन बीएमटी आणि बीएमटी मधील 2 वर्षाचा अनुभव असावा. ऑडिओलॉजिस्ट पदासाठी उमेदवाराने बॅचलर ऑफ ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. सहायक वैद्यकीय अधिकारी पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापिठातून MBBS पूर्ण केलेले असावे. मुख्य परिचारिका/ परिचारिका समन्वयक पदासाठीमनपा किंवा शासकीय रुग्णालयातील निवृत्त मेट्रन किंवा सिस्टर इनचार्ज पदधारक तसेच संबंधित कामाचा 5 वर्षांचा अनुभव असावा.
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 ते 62 वर्षापर्यंत असावे. Djdp उमेदवारांकडून 640 अधिक जीएसटी इतके शुल्क आकारले जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 20 हजार ते 96 हजार 600 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज कॉम्प्रिहेन्सिव थैलासेमिया केअर, बालरोग रक्त रक्त आणि बोन मॅरो टान्सप्लान्टेशन केंद्र, बोरीवली (पूर्व) मुंबई – 400066 या पत्त्यावर पाठवायचे आहेत. 8 नोव्हेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.