आजपासून मुंबईत धावणार २५ हायब्रिड बस, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईत आजपासून हायब्रिड बस धावणार आहे. 

Amit Ingole Updated: Mar 16, 2018, 11:34 AM IST
आजपासून मुंबईत धावणार २५ हायब्रिड बस, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन title=

मुंबई : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईत आजपासून हायब्रिड बस धावणार आहे. एमएमआरडीए खरेदी केलेल्या हायब्रीड बसेसच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकार्पण केलं.

मुंबईत आजपासून काही मार्गांवर २५ हायब्रिड बसेस रस्त्यावर उतरणार आहेत. या बसेस तिकीट १५ ते १०० रूपये दरम्यान असेल. या बसेस विज आणि डिझेलवर चालणा-या आहेत. या बसेस बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथून कांदिवली, ठाणे आणि नवी मुंबईसाठी धावणार आहेत. 

२५ हायब्रीड बस खरेदी केल्या आहेत. या बेस्टकडे चालवण्यासाठी देण्यात येणार आहे. मेक इन इंडिया अंतर्गत केंद्र सरकारकडून १५ कोटी मिळाले आहेत. २५ बसेसच्या खरेदीसाठी एकूण ५० कोटी खर्च आलाय.

‘बेस्टला ८० बसेस’

चालकाला मागील प्रवासी दिसण्यासाठी विशेष सुविधा देण्यात आली आहे. मेकिंग इंडिया अंतर्गत ह्या बस देण्यात आल्या आहे. हायब्रिड बसेस घेण्यात एमएमआरडीए प्रथम संमती दाखवली. बेस्टला ८० बसेस पुढील महिन्यात देण्यात येणार आहेत, अशी माहिती अनंत गीते यांनी दिली.

‘हळूहळू १०० टक्के इलेक्ट्रॉनिक बसेस’

बिकेसीत वाहतूक कोंडी मोठी असते, प्रदूषण वाढत आहे, यासाठी आता एमएमआरडीए ने पुढाकार घेतला आहे. एमएमआरडीए मध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उच्च व्हावी यासाठी ह्या बस सूरु करण्यात आल्या आहेत. हळूहळू १०० टक्के इलेक्ट्रॉनिक बसेस कडे आपल्या जायचं आहे, असे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच एमएमआरडीए मधील लोकांनी कमी कमीत स्वतःच्या गाड्या वापरण्यापेक्षा या बसेस चा वापर करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले.