ऑफिसमध्ये घुसून महिलेवर तरूणाचा चाकू हल्ला

विक्रोळी येथे एका तरूणाने महिलेच्या ऑफिसमध्ये घुसून तिच्यावर चाकूहल्ला केल्याची घटना घडली. त्यामुळे भय इथले संपत नाही, अशी स्थिती मुंबईतील महिलांची असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. रेल्वे स्टेशन परिसरात एका तरूणाने तरूणीस बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती. त्यानंतर अल्पावधीतच ही घटना घडली आहे.

Updated: Oct 22, 2017, 01:49 PM IST
ऑफिसमध्ये घुसून महिलेवर तरूणाचा चाकू हल्ला title=

मुंबई : विक्रोळी येथे एका तरूणाने महिलेच्या ऑफिसमध्ये घुसून तिच्यावर चाकूहल्ला केल्याची घटना घडली. त्यामुळे भय इथले संपत नाही, अशी स्थिती मुंबईतील महिलांची असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. रेल्वे स्टेशन परिसरात एका तरूणाने तरूणीस बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती. त्यानंतर अल्पावधीतच ही घटना घडली आहे.

तरूणाने महिलेच्या चेहऱ्यावर आणि हातावर वार केले गेले. तिच्यावर राजावाडी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी आरोपी साविर हसन मोहम्मद बिन शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. प्राप्त माहितीनुसार साविर हा वाकोला येथे राहतो. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाला असून या मुलीच्या अश्लील क्लिप काढून तिला हा तरुण ब्लॅकमेल करत होता, असा साविर याच्यावर आरोप आहे.

दुपारच्या सुमारास साविर हा महिला काम करत अलसेल्या ऑफिसमध्ये गेला. तिथे त्यांच्यात सुरूवातीला काही शाब्दीक बाचाबाची झाली. या तरूणास ऑफिसबाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात ही महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्या चेहऱ्यावर ३३ टाके पडले आहेत.

दरम्यान, अशीच एक दुसरी घटनाही घडली आहे. नेहरू नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणीला मारहाण करणाऱ्या आरोपी तरुणाला कुर्ला पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. या तरूणावर मारहाण आणि पोस्को कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. इम्रान शेख असं या आरोपीचं नाव आहे. १७ ऑक्टोबरला इम्राननं पीडित तरुणीची छेड काढत धारधार शस्त्रानं तिच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली होती. या मारहाणीत तीच्या नाकाचं हाड तुटल्यानं तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.