मुंबई : Mumbai Drug Case ड्रग्ज पार्टीतून (Drug Party) एनसीबीने (NCB) 10 लोकांना पकडले होतं. त्यातील काहींना सोडलं. भाजप नेत्यांच्या सांगण्यावरून तिघांना सोडल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी (Nawab Malik) केलाय. ऋषभ सचदेवा, प्रतिक गाभा आणि आमीर फर्निचरवाला या तीन जणांना दोन तासात सोडलं. यातील सचदेवा हा भाजपचे नेते मोहित भारतीय याचा मेहुणा असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.
यावर बोलताना नवाब मलिक यांचं दुखणं वेगळं आहे त्यामुळे त्याबद्दल मी जास्त बोलणार नाही असं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी म्हटलं आहे. पण त्याचबरोबर फडणवीस यांनी मोठा खुलासा केला आहे. एनसीबीने ज्या लोकांना सोडलं त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वरिष्ठ नेत्याच्या मुलाचा अतिशय जवळचा माणूस होता, त्याला सोडण्यात आलं. पण मी त्याचं नाव घेत नाही कारण तो क्लीन होता. त्याचं नाव घेऊन त्याला बदनाम करणं अयोग्य आहे. आणि म्हणून एनसीबीने क्लिअर केलं आहे, की जे क्लीन होते त्यांना सोडलं होतं, ते कोणत्या पक्षाचे होते की नव्हते, हा मुद्दाच येत नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
एनसीबीने स्पष्टपणे सांगतिल होतं की त्यांनी अनेक लोकांना पकडलं होतं, त्यातले जे क्लीन होते, त्यांना त्यांनी सोडलं, आणि ज्या लोकांकडे काही सापडलं त्या लोकांना एनसीबीने पकडलं असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. ड्रग्स म्हणजे आपल्या समाजाला लागलेली किड आहे. याच्याविरुद्ध जर एखादी एजन्सी जर काही काम करत असेल. तर त्या एजन्सीच्या पाठिमागे आपण उभं राहिलं पाहिजे, हा कुठल्या पक्षाचा प्रश्न नाही आहे. हा आपल्या समाजाचा आणि तरुणाईचा प्रश्न आहे. पण याचं राजकारण केलं जातं आहे. ज्या लोकांना सोडलं त्यामध्ये एनसीपीच्या वरिष्ठ नेत्याच्या मुलाचा एक अतिशय जवळचा माणूस यालाही सोडण्यात आलं.