प्रकाश आंबेडकरांनी 1 हजार कोटी रुपये घेतले, कुणी केला आरोप? जाणून घ्या

मागील विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांनी 1 हजार कोटी रुपये घेतले होते. त्यातूनच प्रकाश आंबेडकर हे हेलिकॉप्टरमधून फिरले होते, असा आरोप करण्यात आलाय.

Updated: Mar 29, 2022, 04:32 PM IST
प्रकाश आंबेडकरांनी 1 हजार कोटी रुपये घेतले, कुणी केला आरोप? जाणून घ्या title=

नांदेड : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी मागील विधानसभा निवडणुकीत एक हजार कोटी रुपये घेतले. त्यातूनच प्रकाश आंबेडकर हे हेलिकॉप्टरमधून फिरून प्रचार केला. त्यांच्या प्रचारामुळे निवडणुकीत मतविभाजन होऊन जास्त फायदा भाजपला झाला असा आरोप शिवसेनेचे हिंगोली जिल्ह्याचे प्रमुख आणि आमदार संतोष बांगर यांनी केला होता. 

आमदार संतोष बांगर यांनी केलेल्या आरोपानंतर वचिंत बहुजन आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले होते. वंचित बहुजन आघाडीवर टीका करणारे आमदार संतोष बांगर पाचवी शिकले आहेत. या अल्पशिक्षित आमदाराला १२ वी नंतरच्या शिक्षणासाठी पाठवायला हवे. म्हणजे त्याला थोडीशी अक्कल येईल, अशी टीका या पदाधिकाऱ्यांनी केली होती.

आमदार संतोष बांगर यांच्या वक्तव्यानंतर वंचितच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून एकच रोष व्यक्त केला होता. तर, नांदेड येथील वकील नितिन सोनकांबळे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर केलेले आरोप सिद्ध करा, अन्यथा न्यायालयामार्फत गुन्हा दाखल करू असा इशारा दिला. 

यानंतर आता आमदार संतोष बांगर यांना वकिल नितिन सोनकांबळे यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. सात दिवसात आरोप सिद्ध करा अन्यथा अब्रू नुकसानीच्या दाव्याला सामोरे जा असे या नोटीसमध्ये म्हणण्यात आलंय.