मुंबई : राज्य मंत्रिमंडळाकडे आलेल्या प्रस्तावावर तब्बल दहा वर्षांच्या कालावधीनंतर निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता राज्यातील किराणा दुकान, सुपर मार्केट येथे 'वाईन' विक्रीला परवानगी मिळाली आहे. राज्य मंत्रिमंडळाने आज हा निर्णय घेतला आहे.
राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार असताना वाईनला मार्केट उपलब्ध व्हावे. यासाठी किराणा दुकान, सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्यात यावी असा प्रस्ताव आला होता. मात्र, यावर निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यानंतर सरकार बदलले आणि आता दहा वर्षानंतर या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.
आज घेण्यात आलेल्या निर्णयानुसार एक हजार स्क्वेअर फुटापेक्षा जास्त जागा असणाऱ्या सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला मुभा दिली जाणार आहे. सुपरमार्केटमध्ये एक स्टॉल म्हणजे एक शोकेस निर्माण करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चालना मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री नबाव मलिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
महाराष्ट्रात बऱ्याच वायनरी आहेत. शेतकऱ्यांच्या फल उत्पादनावर वायनरी चालत आहे. त्यांच्या प्रोडक्ट्सला चालना देण्यासाठी ही परवानगी देण्यात आली आहे. सरकारने ही नवीन पॉलिसी ठरवली आहे, असे त्यांनी सांगितले.