मुंबई : मुंबईकरांना अजूनही पावसासाठी प्रतीक्षा करावी लागू शकते. कारण अजूनही मुंबईत जून अखेर उजाडला तरी पाऊस म्हणावा तसा आला नाही. पुढचे 4 दिवस मुंबई-ठाणे उपनगरात तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर हवामान विभागाने काही जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट दिला आहे.
हवामान विभागाने पुढचे चार दिवस रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अलर्ट दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात 29 आणि 30 जून रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाने परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, जिल्ह्यांमध्ये 29 आणि 30 जून रोजी मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. अजूनही मुंबई-ठाण्यात म्हणावा तेवढा पाऊस झाला नाही.
जून अखेर उजाडला अजून पाऊस आला नाही. त्यामुळे काही ठिकाणी पाणीकपात सुरू करण्यात आली आहे. राज्यात पेरण्यांची गडबड करू नये असं आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आलं.