पोटच्या मुलांनी केली वडिलांची हत्या

रांजणगाव देशमुख येथे दोन पोटच्या मुलांनी आपल्या वडीलाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. 

Updated: Sep 9, 2017, 06:03 PM IST
पोटच्या मुलांनी केली वडिलांची हत्या title=

अहमदनगर : रांजणगाव देशमुख येथे दोन पोटच्या मुलांनी आपल्या वडीलाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. 

मधुकर फकीरा आणि विकास फकीरा या दोन मुलांनी आपले वडील रणधीर फकीरा यांचा खून केलाय. शेतीच्या वादातून दोन मुलांनीच हा खून केल्याचे समोर येतेय. 

शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणी मधुकर आणि विकास या दोन आरोपीना पोलिसांनी अटक केले आहे.