ठाणे : धक्कादायक बातमी. ठाण्यात दोघा माथेफिरूंनी पोलिसांवरच जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. (two persons attacked on police at thane ) ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई केल्याने रागाच्या भरात दोन मद्यपींनी वाहतूक पोलिसावर वीटेने हल्ला केला. ठाण्याच्या कापूरबावडी परिसरात ही घटना घडलीय.
दोघांच्या हल्ल्यात नागनाथ कांदे असे हल्ल्यात जखमी झालेल्या पोलीसाचे नाव असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर या हल्ल्याप्रकरणी आरोपी अनिल गुप्ता आणि भगीरथ चव्हाण यांना अटक केली आहे. या सर्व प्रकारावरून पोलीसच असुरक्षित असल्याचं समोर आले आहे.
कापूरबावडी वाहतुक पोलीस विभागातील एका पोलीसावर नाकाबंदी दरम्यान माथेफिरूने हल्ला केला. मुख्य आरोपी अनिल गुप्ता याने पोलिसाच्या डोक्यात वीट मारली. याप्रतरणी राबोडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले.
होळी आणि धुळीवंदन निमित्त ठाणे शहर वाहतूक विभागाची मद्यपी वाहन चालकांवर दिवसभर कारवाईची विविध ठिकाणी मोहीम सुरु होती. कारवाई दरम्यान दोन्ही आरोपींनी मद्य प्राशन केले होते. त्यामुळे मुख्य आरोपी अनिल गुप्ता याच्यावर कलम 185 नुसार तर सह आरोपी भगीरथ चव्हाण याच्यावर 188 नुसारकारवाई करण्यात आली होती. त्यांना शनिवारी न्यायालय हजर होण्याचे पोलिसांनी आदेश दिले होते. मात्र केलेल्या कारवाईचा राग मनात धरून वाहतूक पोलिसावर हल्ला केला.
झालेल्या संपूर्ण प्रकारा नंतर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहतूक पोलीस हवालदार यांच्यावर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची तब्बेत आता स्थिर आहे.