सर्फराज सनदी, झी मीडिया, सांगली : जिल्ह्यातल्या आटपाडीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. गावातल्याच तरुणांनी तीन अल्पवयीन मुलींना फूस लावून फिरायला नेलं आणि त्यांच्या बलात्कार केला. या घटनेने सांगली (Sangli) जिल्हा हादरला आहे. पोलिसांनी लॉज चालकासह तीन संशयीत तरुणांना अटक केली असून त्यांच्यावर पॉक्सो अंतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 27 डिसेंबरला ही घटना घडली होती.
काय आहे नेमकी घटना?
गावातील चार तरुण गेल्या अनेक दिवसांपासून पीडित मुलींचा पाठलाग करत होते. 27 डिसेंबरला गावातील या तरुणांनी अल्पवयीन मुलींना फूस लावून फिरायला जायचं असल्याचं सांगितलं. त्यानंतर आरोपी या मुलींना घेऊन गावाच्या बाहेर असलेल्या कौठुळी रस्त्यावरील तृप्ती लॉजवर घेऊन गेले. इथं त्या आरोपींनी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी इन्स्टाग्रामवर तरुणींशी ओळख वाढवली. त्यानंतर त्यांना फिरायला जाण्याच्या बहाण्याने भेटायला बोलावलं. आटपाडी इथल्या कल्लेश्वर मंदिराजवळ त्यांना बोलावून घेतलं आणि तिथून त्यांना कौठुळी गावाजवळ असलेल्या तृप्ती लॉजवर नेऊन बलात्कार केला.
घडलेला प्रसंग पीडित मुलींनी आपल्या कुटुंबियांना सांगितलं. यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आटपाडीतल्या बनपुरी गावातील पांडुरंग यमगर, सुभाष यमगर आणि शेंडगेवाडी गावातील किरण शेंडगे या तिघांविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करणअयात आला आहे. तर तृप्ती लॉजचा व्यवस्थापक रिंकू यादव यालाही अटक करण्यात आली आहे. चारही आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतरत्यांना सहा तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.